१. जर संजय दत्तच्या घरी शस्रास्रे नेणारे गुन्हेगार असतील, ते शस्रास्रे नष्ट करणारे गुन्हेगार असतील, तर शस्रास्रे ठेवणारा संजय दत्त निर्दोष कसा?
२. न्या. कोदे म्हणतात निकालपत्रक पहा म्हणजे तुम्हाला कळेल.
मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणतात संजयच्या विरोधात आपिल करणार नाही.
थोडक्यात सुनिल दत्त व प्रिया दत्तयांची पुण्यायी पुन्हा एकदा काम करून गेली.
जर संजयदत्त हा टाडा च्या नियमानुसार आतंकवादी होऊ शकत नाही तर ऊद्या याच निकालाचा आधार घेऊन ईतर आरोपी देखील निर्दोष सुटले तर नवल वाटण्यास कारण नाही.
संजय दत्त सुटल्या बद्दल नाराज होण्याचे काहीच कारण नाही. आज ना ऊद्या तो पुन्हा कोणत्याना कोणत्या वादात आडकणारच. याची मला पुरेपूर खात्री आहे मात्र, त्यावेळीही तो सुटेल याचीही देखिल मला खात्री आहे.