सुरुवात कोणी केली आहे हे आपणांस माहीत आहे का ?
कोणाही रस्त्यावरच्या अयऱ्या गयऱ्या नत्थु खयऱ्याला मी माझ्याशी 'काका/मामा' संबोधून सलगी करू द्यावी हा कोणाचा आग्रह आहे का ?
मग ज्या भाषेत प्रश्न त्याच भाषेत उत्तर हे काय चुकीचे आहे ?
उरला प्रश्न कंपूगिरीचा....
अहो मनोगत हाच एक संकेतस्थळांमधला एक कंपू आहे !
त्यातही ज्या लोकांचे आपापसात पटते; ज्यांचे विचार जुळतात....
त्यांनी एकत्र आले तर दुसऱ्यांच्या का पोटात दुखावे ?
अहो, तुम्हीही बनवा की तुमचा कंपू.... तुमच्या समान विचारधारणेशी जुळवणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन चला....
आम्हाला आपले विचार पटले तर सोबत येऊच - तेही तुम्ही घेतले तर !