मनोगतावर गैरहजर असतानाची तारीख स्वतःच्या लेखनात हमखास सापडते.
'दैनंदिन लेख' वर टिचकी मारायची- ज्या तारखेपासून गैरहजर असेन त्या तारखे पर्यंत दिनदर्शिकेच्या माध्यमातून जायचे.
कविता, लेख, चर्चा, पाककृती तपासायचे. आवडेल तो लेख वाचनखुणा मध्ये सोडायचा. 
हजर असलेल्या तारखेपर्यंतच्या लेखांचे/कवितांचे/चर्चांचे 'वाचनखूण' वापरून साठवणी करून ठेवायची.
प्रतिसाद देताना उलट दिशेने सुरुवात करावी- उदा: १५ नोव्हें पर्यंत गैरहजर असल्यास त्या तारखेच्या लेखांना प्रथम प्रतिसाद मग १४च्या, मग १३च्या वगैरे. पण 'वाचनखूण' चा व्यवस्थित उपयोग करावा व कितीही मोह झाला तरी जोवर सगळे मिसिंग लेख त्यात साठवले जात नाहीत तोवर ते उघडून वाचायला सुरुवात करायची नाही अन्यथा एकदा वाचनांत गढलो की संपले.....