हा विषय फारच छान आणि उद्बोधक आहे यात शंकाच नाही.

या संदर्भात दोन गमतीची उदाहरणे-

एका मुलीला पहायला आलेल्या मुलाला परस्पर संवादाची संधी दिली गेली तेंव्हा तो मुलगा तिच्या रूपाविषयी जरा अशिष्ठपणाचे बोलू लागला. स्वाभाविकपणें मुलीला राग आलाच. पण संयम न सोडता ती त्याला म्हणाली,
" आपण जरा दुसरं कांही, तुमच्या ऑफीस विषयी बोलू या कां ? "
आणि तो समजयचे तें समजला.

घरी एक पाहुणे आले होते. त्यांना चहा दिला गेला आणि विचारण्यात आलं
'चहा कसा झाला आहे ? '
पाहुणे उत्तरले,
" मस्तच झाला आहे. पण थोडी साखर आणखी चालली असती."
खरं तर त्या चहात साखर घालायची राहूनच गेली होती.

अशा रितीने संवादातला तिखटपणा टाळता येतो.