प्रियालीताईंची थरारक अनुभवांवर मक्तेदारी असावी की काय असे वाटायला लागले आहे. जिथे जावे तिथे थराराने पाठलाग करावा असे भाग्य फार थोड्यांचे असते.
खरंय! आजकाल माझ्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांनी मला आडूनपाडून आमच्याकडे येऊ नका असे सुचवले आहे. मी सोबत वादळ घेऊन जाईन की काय असे त्यांना वाटायला लागले आहे. ;-) मी ही घरातून बाहेर पडले की एखादा ढग माझ्या पाठलागावर तर नाही याची खातरजमा करून घेते.
 
याचवर्षी जून महिन्यात फ्लोरिडाहून परत येताना धावपट्टीला विमान जेमतेम पोहोचले आणि भयंकर वादळामुळे तेथेच ठप्प झाले. त्यावेळेस सुमारे ४-५ तास त्या विमानात एकाच जागेवर अडकून पडलो होतो, आणि त्यानंतर सुमारे ६-७ तास अटलांटा विमानतळावर.

नंतर ऑगस्टमध्ये सिनसिनाटीला फिरायला गेलो असताना असाच अनुभव. अर्थात या दोन्ही ठिकाणी निवाऱ्याच्या जागा उत्तम असल्याने लिहिण्यासारखे फार नाही. :)
 
मीराताई:
तुमचे हे धैर्य अपवादात्मक आहे.
धन्यवाद. खरं म्हणजे माझ्याकडे काही पर्याय नव्हते, दोन्ही वेळेस मुलगी सोबत होती हे एक शांत राहण्याच कारण आणि दुसरं म्हणजे टोरनॅडो इतके जलद वेगाने गाठते आणि निघूनही जाते की विचार करायला वेळच मिळत नाही.