मी जेथे जेथे कॅसिओचे नाव घेतले आहे तेथे १२ स्वरांची ३। सप्तके देणारे कुठलेही वाद्य एवढेच मला अभिप्रेत होते/आहे. तसे सुरुवातीला म्हटलेही आहे.
कुठल्यातरी रीतीने १२ स्वर वाचकाच्या डोळ्यासमोर आले तर समजायला सोपे इतकाच मर्यादित उपयोग मला करायचा होता. या गणितासाठी किंवा तांत्रिक बाबींसाठी हार्मोनियम काय किंवा कॅसिओ काय मी एकच धरतो.
आता कशाचा आवाज चांगला/सुंदर येतो या वादात पडण्याची मला इच्छा नाही. प्रत्येकाने आपापले सौंदर्यशास्त्र ठरवावे.
नॅचरल स्केल जाऊन टेंपर्ड स्केल आले ही अशुद्धता एकदा स्वीकारली की पुढे काय वाट्टेल ते झाले तरी ते सहन करावेच लागेल.
शेवटी हिंदू धर्म जितका काळ टिकला तेवढा काळ संगीत टिकले म्हणजे मिळवली. जर काही सत्त्व असेल त्यात तर तसे होईलही मग वाद्ये कशीही बदलोत, आणि सत्त्व टिकून राहील अशी श्रद्धा/विश्वास बाळगणे एवढेच आपल्या हातात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचे शास्त्र कुठवर पोचले आहे यावर मिलिन्दशेठने स्वतंत्र लेख लिहावा.
वाद कसला घालता, गुपचूप ऐकता येईल तेवढे संगीत आपापल्या आयुष्यात ऐका आणि पुढे कुठे जाणे असेल तिथे जा. मालकांचे (म्ह. मनोगतशेठ) पैसे व तुमचा वेळ वाया घालवू नका.
किंवा घालवा. तुमची मर्जी.
दिगम्भा