खुशी,

तसा माझाही भुतावर जरा फारच विश्वास आहे. देव आहे असे मी मानते म्हणून भूत आहे असे सहजपणे मान्य करू शकते. तेथे बुद्धीला जोर देऊन तर्क सुसंगत विचार करणे वगैरे मला काही जमत नाही.

माझाही भुतांवर जाम विश्वास आहे. भूत-मात्रांवर हो! बाकी, बुद्धीला इतर कामे नाहीत का? की या गोष्टींवर जोर द्या, म्हणून मी अजीबात जोर देत नाही, तुम्हीही देऊ नका.

मी भुते आहेत असेच मानते नाहीतर धारप, स्टीफन किंग आणि मतकरी वाचताना मजा कशी येणाऱ? घोस्ट हंटर्स, हॉन्टेड, मिडिअमसारख्या मालिकांची मजा कशी घेणार? असो. बिनधास्त विश्वास ठेवा; पण घाबरू नका. भुतांपेक्षा जीवंत माणसेच अधिक धोकादायक असतात. आणि हो, या अंधश्रद्धेची ऐशीतैशी. मनोगतावर भूतप्रेमी बरेच आहेत.

मध्यंतरी मनोगतावर मी या पाश्चात्य लोकांचा भूता-खेतांवर भारी विश्वास असे म्हटल्यावर एका विद्वानांनी मला अंनिसचे कार्य समजावून घ्या असा भारी मोलाचा सल्ला दिला होता. काहीहीहीही!!

असो.

माझ्या घरापासून मैलभरावर एक "T" जंक्शन आहे. रस्ता तेथे अचानक उतार घेतो आणि संपतो/वळतो.  समोरच घनदाट जंगल आहे. रस्त्यावर दिवे नाहीत, संध्याकाळनंतर फारशा गाड्याही रस्त्यावर नसतात, एकदा रात्र झाली की चिटपाखरूही नजरेस पडत नाही. याभागाला 'हेडी हॉलो' असे म्हणतात. फारा वर्षांपूर्वी याभागात हेडी नावाच्या एका गृहस्थांचे अनाथालय होते म्हणे आणि काही कारणांनी त्याला आग लागून त्यातील बऱ्याच मुलांचा मृत्यू झाला.

आजही एखाद्या अंधाऱ्या रात्री जेव्हा हवा पावसाळी असते, जोराचं वारं सुटलेलं असतं, किंवा जबरदस्त हिमवर्षाव होत असतो त्यावेळेस रात्री बेरात्री जाणाऱ्या एकट्यादुकट्या गाडीला काही मुले रस्त्यावर कुडकुडताना दिसतात, त्यांच्या हातात एक लहानसा कंदील असतो. हात वर करून ती लांबूनच गाडी थांबवण्याचा व लिफ्ट मागण्याचा इशारा करतात. गाडीवाला अंधारात त्यांच्या दिशेने गाडी कडेला उभी करतो, दरवाजा उघडतो. त्याला हुंदक्याचे अस्पष्ट आवाज ऐकू येतात पण बाहेर कोणीच नसते.

हुडूत!!! ही गोष्ट आमच्या भागात प्रसिद्ध आहे. हज्जारदा या रस्त्यावरून जातो, रात्री-बेरात्रीही कोणी भेटले नाही. त्यावरून भुते मला घाबरतात असा मी निष्कर्ष काढला आहे. ;-)

(भूतप्रेमी) प्रियाली.