म्हणजे विनोदच आहे पण सत्यही आहे.
मध्यंतरी माझी एक मैत्रिण बाल्टीमोरहून परत येताना तिच्या विमानाला हवेत वादळाचे धक्के (टर्ब्युलन्स) बसले. परत आल्यावर तिने मला लगेच फोन लावला आणि म्हणाली, "मी त्या विमानात सारखी वळून इथे तिथे पाहात होते. न जाणो तुझं कुटुंब याच विमानात बसलेलं असायचं."
माणसाचे नाव माणसंच खराब करतात असं ऐकलं होतं. आमचं नाव वादळं खराब करत आहेत. :D आहे की नाही गम्मत!