हा प्रश्न छू तसेच सन्जोप राव प्रभृतींना उद्देशून आहे.
प्रथमच हे नमूद् करतो की तुमच्यासारखाच मीहि जी. एंच्या सर्व साहित्याने झपाटून गेलेलो आहे. जी.एंच्या कथा किंवा त्यांचे इतर साहित्य इथे मुळापसून उधृत करण्यामागची, एक चांगले, अभिजात साहित्य जास्त लोकंसमोर मांडण्यामागची तळमळ मी समजू शकतो. हा जो तुमचा आनंद आहे, तो मी समजतो. परन्तु त्याला दुसरी जी बाजू मला सतावत रहाते, त्यानिमित्ताने हे निवेदन.
ह्या प्रयत्नांमुळे होतयं हे कि ज्यांना जी.एंच्या बद्दल विशेष जाण नव्हती, किंवा अजूनही नाही, अशा सर्व मंडळींसाठी हे सर्व साहित्य बिनबोभाट, काही प्रयत्न न करता मिळणार. दस्तूरखूद्द जी.एंची ह्यामागची भूमिका अशी होती, (आणि ती मला पूर्णपणे पटते) की चांगले साहित्य, किंबहूना कुठलीहि चांगली कलाकृति माणसाने थोडीशी तोशीश लावूनच प्राप्त केली पाहिजे. त्यामागे त्या व्यक्तिची, त्या कलाकृतिबद्दलची तळमळ जाणवली पाहिजे.
आता हा भाग १९२ जणांनी वाचला. त्यांपैकी किती जणांना जी.एंबद्दल काही माहिती होती? 'माणूस नावाचे बेट' संपल्यावर किती प्रतिक्रिया आल्या? त्यांत किती जणानी काही प्रकारची, त्या कथेबद्दलची जाण व्यक्त केली? म्हणजे बहुतेक मंडळींना, एक व.पु. होते, तसेच, एक जी. ए. ही होते, एवहढंच! किती जणांनी हे सर्व आंच असून वाचलं? फ़क्त एकच नशीब म्हणजे, अगदीच कुणीतरी विमानतळावर वेळ घालवायला वाचलं नसावं! तेव्हा हा प्रपंच जरी चांगल्या उद्देशाने होत असला, तरी ह्या मुद्द्याचा विचार व्हावा.
....प्रदीप