प्रदीप महोदय,
आपण वरील प्रश्न मला विचारलेला नाही पण त्याचे मी उत्तर लिहितोय याबद्दल आधीच क्षमा मागतो. तरी माझे उत्तर आपण वाचावे अशी आपणाला विनंती.
मनोगतावर अनेक लोक अतिशय उत्तम साहित्य प्रकाशीत करत असतात. त्यातले बहुतांश हे त्या व्यक्तीने निर्माण केलेले असते. त्यामुळे त्या बद्दल त्या व्यक्तीला जास्तच ममत्व असणार. पण कोण वाचेल, काय म्हणेल याची तमा न बाळगता ते लोक आपला आनंद वाटून वाढवत असतात. एक जण का होईना त्या साहित्याला लेखकाला अपेक्षीत प्रतिसाद देतोच. मग चिंता कसली?
दुसरा मुद्दा असा की, ग्रंथालयात, अनेक पुस्तके सहज समोर असतात, त्यात 'हिरवे रावे' हे पुस्तक दिसले, चला पाहूया म्हणून घरी नेले, आणि 'कित्ती बोअर' असे म्हणून परत करून टाकले असे लोक असणारच ना!
बारा भाग एका कथेचे चिकाटीने लिहिणारे आणि ते भाग आवडत आहेत म्हणून वाचत राहणारे इथे लोक आहेत . जी ए यांचे साहित्य भारतापासून लांब राहणाऱ्यांना अशा तऱ्हेने वाचायला मिळाले तर काय चांगलेच आहे ना! आणि कोण किती सूक्ष्म विचार करतो, त्याची आवड निवड/ अभिजात साहित्याबद्दलच्या कल्पना आणि मते आपल्या सारखीच असतील असे नाही. तर काय, या आनंदात आपण सहभागी होऊया. ज्यांना स्वतःला आंबे आवडतात, आणि जे इतरांनी खावेत असे वाटल्याने मुक्त हस्ताने इतरांना वाटतात, त्यांना कोण कसा खातो, त्याला काय वाटते, रसग्रहण कोणी केले आणि कोणी उदरभरणासाठी खाल्ले याची चिंता का वाटावी !
कळावे, लोभ असावा,
--- (प्रामाणिक) लिखाळ.