'शीर्षकाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष कथेत पडले नाही' हा एक मुद्दा वगळता ही दीर्घकथा चांगलीच रंगतदार झाली आहे.आधीचा भाग वाचल्यानंतर पुढच्या भागाची उत्सुकता सर्वांना वाटत होती ह्यातच कथेचे यश सामावले आहे.आठ भागांची आणि इतके तपशील (उदा. स्थानिकस्वराज्यसंस्थांची रचना) असणारी ही कथा संपली खरी. मात्र मलाही इतरांप्रमाणेच असे सुचवावेवेसे वाटते की 'तेजस्विनीच्या ' राजकीय कारकीर्दीचा आलेख मांडणारा उत्तरार्ध आपण लिहावात.
म्हणजे कदाचित आताचा पूर्वार्ध आणि तो उत्तरार्ध मिळून सकस कादंबरी होईल!