मलाही इतर सर्वांनी म्हटल्याप्रमाणे आपण उत्तरार्ध लिहावा असे सुचवावेसे वाटते.
सहमत.
आपण इतके सर्व बारीकसारीक तपशील नीट मांडले आहेत, सर्वच भाग ओघवते होते, हेही महत्त्वाचे. आणि इतके भाग असूनही आम्हाला वाट न पाहायला लावता रोज एक भाग दिल्याने कथेची रंगत वाढली, त्याबद्दल धन्यवाद.
याच्याशीही सहमत.
इतक्या पात्रांना घेऊन एक सुसंबद्ध डोलारा उभा करणे हे सोपे काम नाही. एवढे करूनही कथा पकड घेते. या भागांमधून तेजस्विनीचे तेज झळाळले नाही असे वाटले तरी तिची राजकिय कारकिर्द ही सरळसोट होईल असे वाटत नाहीत. अनेक पैलूंनी म्हणजे राजकिय अडचणी, विरोधी पक्ष, प्रियांकसारखे टारगट, घरातील अडचणी यासर्वांसोबत एक सुरेख उत्तरार्ध लिहिता येईल.