असे ऐकले आहे की गदीमांना एकदा कुणीतरी आव्हान दिले की इतकी गाणी लिहीत असता तर "ळ" हे यमकात असेल असे गाणे लिहून दाखवा.  आणि मग माणिक वर्मांच्या सुरेल आवाजातले आणि मला वाटते की सुधीर फडक्यांचे संगीत असलेले गीत तयार झाले: (सगळे "ळ" ठळक अक्षरात)

घननीळा लडीवाळा झुलवू नको हिंदोळा

सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे

काज गाली सहज ओघळे, या साऱ्यांचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा

सांजवे ही आपण दोघे, अवघे संशय घेण्याजोगे

चंद्र निघे बघ झाडा मागे, कालींदिच्या तटी खेळतो, गोपसुतांचा मेळा ॥ झुलवू..॥