खालील पाळण्याचा/ची कवी/कवयित्री माहीत नाही पण घननीळा प्रमाणेच यमकात "ळ" आहे (आणि पाळण्याचा अर्थ पण चांगला आहे):

जमवूनी आप्त इष्ट मेळा, चालला नामकरण सोहळा

प्रेमळ कोमल तुझीही माता, नाव गोड तुझं ठेवी आता

गोड नाव हे ऐकुनी कानी, गाली हास बाळा॥ चालला..॥

नाव कमवणे, नाव मिळवीणे, माय पित्याचे नाव राखणे

नावाचा ह्या जगतामध्ये अर्थ असे आगळा ॥ चालला..॥

विजयी होई तू जगती ह्या, जमलो सगळे आशिष द्यावया

यशकिर्तीची सदैव तुझीया, कंठी वसो माळा ॥ चालला..॥