"माझे शब्द" येथे मी लेखन करण्याचा प्रयत्न केला होता/आहेच. पण 'युजर फ्रेंडली' अशी ही मनोगतावरची लेखन पद्धती आहे, ती तेथे किचकट वाटली. अर्थात संगणकातले तज्ज्ञ ह्यावर अधिक प्रकाश टाकतीलच (केदारने हातभार लावलेला आहेच)
एक सर्वसामान्य उपभोक्ता म्हणून इतकेच सांगावेसे वाटते की, जोवर लेखन पद्धती सहज सोपी होत नाही तोवर सर्वसामान्य मंडळींना लेखन करणे त्या ठिकाणी कठिण जाईल.
अर्थात ज्या लेखकांना ब्लॉग्स, RSS feed वगैरे वर लेखनाची सवय आहे त्यांना कठिण काहीच नाही. परंतू एका सर्वसामान्य कारकुनाला कार्यालयात बसून मनोगतावर जो प्रतिसाद टाकता येतो त्याचे समाधान 'माझे शब्द' ला मिळेल की नाही हे सांगणे अवघडच आहे.
स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व- पण सुधारणेला वाव त्यामुळेच मिळेल !