लेख उपयुक्त आहे, आवडला. यावरुन अकबर बादशहाच्या एका गोष्टीची आठवण झाली. आपले सगळे दात पडले आहेत, फक्त एकच शिल्लक आहे असे बादशहाला स्वप्न पडल्यावर त्याने त्याचा अर्थ विचारण्यासाठी दोन वेगवेगळ्या ज्योतिष्यांना पाचारण केले.
पहिल्याने 'तुमच्या साऱ्या नातेवाईकांचा मृत्यू तुमच्या आधी होईल' असा अर्थ सांगितला, तर दुसऱ्याने 'तुम्ही तुमच्या नातेवाईकांत सर्वात दीर्घायुषी ठराल' असा तोच अर्थ पण वेगळ्या स्वरुपात सांगितला.