याच पुस्तकात जी.एं. नी अरभाटचा अर्थ सांगून ठेवला आहे, (आगाऊपणाबद्दल छू यांची क्षमा मागून) तो परिच्छेद असा आहे-

"अरभाट हा एक अतिशय गुणी कानडी शब्द आहे. अरभाट म्हणजे खानदानी, भव्य, मोठ्या थाटामाटाचा. मठातील जेवण कसे होते? अरभाट. मन्सूरांचे गाणे कसे झाले? तर अरभाट. हृषिकेशला गंगा कशी आहे? तर अरभाट. देवळासमोर झालेल्या नाटकातील हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा होत्या, तर अरभाट. म्हणजे अगदी क्लास!"