सर्वप्रथम, पुतळ्याची विटंबना ही राजकीय हेतूने झाली असावी असा माझा अंदाज आहे. लोकांना चिथावणी देणे, भडकवणे हा उद्देश असावा. ज्या समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते त्या समाजाच्या बाबतीत हे जाणीवपूर्वक केले जाते.
आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून जी हिंसक प्रतिक्रिया आली त्यामुळे त्यांचेच नुकसान जास्त झाले असे वाटते. आधीच दलित समाजाबद्दल कोणाला आपुलकी नाही. त्यात अशा घोडचुका करुन तो समाज स्वतःला मुख्य प्रवाहापासून दूर नेत आहे.
हिंसक प्रतिक्रियेमागे राजकीय हितसंबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यापेक्षाही मिलिंदरावांनी व्यक्त केल्याप्रमाणे पुतळ्याची विटंबना हे तात्कालिक कारण आहे. समाजातील आर्थिक दरी पूर्वीपेक्षा खूपच वाढली आहे. त्यामुळे असा विद्वेष खालच्या स्तरातील सतत धुमसत असतो. सध्याच्या खैरलांजी प्रकरणातील शासनाची भूमिकेमुळे त्या असंतोषाला खतपाणीच मिळाले. यात मुख्यत्वे राष्ट्रवादी पक्षाची जबाबदारी जास्त आहे. पिंपरी-चिंचवडमधे असलेला राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव आणि तेथे झालेल्या दंगली यांचा कुठेतरी संबंध असावा अशी शंका आहे.