आजच्या बातम्या वाचून मला अजून काही प्रश्न पडले आहेत. यात राजकीय हात होता हे पटते पण जे लोक याला उत्तर म्हणून डेक्कन क्वीन जाळतात त्यांच्याविषयी काय बोलावे? कुठल्याही गटाचा आय. क्यू. (शब्द?) हा त्या गटातील सर्वात कमी आय. क़्यू. असलेल्या माणसाचा असतो हे मानसशास्त्रीय विधान अशा वेळी पटते.
काल याबद्दलच मी पुतळे काढून टाकण्याचा उपाय सुचवला होता पण आता वाटते की त्याने काही फारसा फरक पडणार नाही. दोष कुठेतरी दुसरीकडे खोलवर रुजलेल्या मनोवृत्तीमध्ये आहे.
हॅम्लेट