नामदेवराव,
माझे आजोबा म्हणत की श्रद्धा म्हणजे सत्य धारण करायची शक्ती. त्यामुळे त्यांना विश्वास-अंधविश्वास हे शब्द जास्त पसंत होते. पण श्रद्धा अंध कशी असेल असे ते म्हणत. असो. हा फक्त शब्दांच्या वापरापुरता मुद्दा आहे.
आता सत्य धारण करायची शक्ती असे म्हटले तर मग 'विज्ञानवादी' आणि अध्यात्मातील काही संकल्पनांवर विश्वास ठेवणारे विचारी लोक हे दोघेही ही शक्ती बाळगतात आणि सत्य काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्यात खरेतर वाद असायचे मला कारणच दिसत नाही.
आपला,
--लिखाळ.