शब्दांची जादू काय विलक्षण असते नाही? 'रखरखीत' हा शब्द कसा मुंडण करून, कपाळाला भस्म फासून तळपत्या उन्हात अनवाणी उभा राहिल्यासारखा वाटतो. 'मुलायम' कसा कोवळ्या नारळाची कातळ पांघरून थंडीत उबत बसलेला. 'जळजळीत' शब्द तेलकट लालभडक तवंगात निखाऱ्याचे प्रतिबिंब पडलेले असावे तसा... अशी किती उदाहरणे सांगावीत?
सुंदर लेख.