दिगम्भा,
ठराविक ८५ प्रतिसादांची मर्यादा येण्याअगोदर आपण गाडी मूळ विषयाकडे वळवूया.
राग म्हणजे काय, ते कसे ओळखायचे हे आपण थोडक्यात सांगितले आहे. यापुढे ही लेखमालिका कशी सादर करणार आहात? त्याची काही रूपरेषा आपण ठरवली आहे का?
११ लेखांच्या मालिकेत गुंफलेल्या या बसंतच्या लग्नात तात्यांनी गोष्टीस्वरूपात रागांची माहिती दिली आहे. त्यामुळे राग कसे रम्य आहेत त्याचे हृद्य वर्णन आहे. तसेच ते राग कोणी कसे पेश केले आहेत तेसुद्धा दाखवले आहे.
श्री. राजन पर्रीकर यांची एक प्रचंड लेख मालिका आतरजालावर इथे उपलब्ध आहे. या दोन मालिकेप्रमाणे इथे काही सादर करणार आहात का?
यात काही मदत हवी असल्यास जरूर सांगा.
शास्त्रीय संगिताचे शिक्षण कसे घ्यावे, ते कसे ऐकावे, त्याच्या गोडीचा आस्वाद कसा घ्यावा, मैफिल म्हणजे काय, तिची स्वरूपे काय, वगैरे माहिती आपण देऊ शकाल.
ख्याल, ध्रुपद, नोम तोम, तराणा, ठु.बरी, दादरा, पदे, इतर उपशास्त्रीय पद्धति यावर लिहू शकाल.
बघा. काही कल्पना मांडल्या आहेत. त्याचा राग मानू नका. पाहिजे तर व्य. नि. पाठवा.
कलोअ,
सुभाष