सातीताई, लेख चांगला आहे, समस्या खरी आहे यात शंका नाही.

कंपन्या औषधे विकण्यासाठी जाहीरात करतात, त्यांची चाकरी करणारे एम आर पोटासाठी त्या औषधांचा प्रचार.  डॉक्टरांना देतात त्या भेटवस्तू ह्या मार्केटिंगचाच एक भाग. आता रुग्णाला औधष देताना त्यातील घटक व आवश्यकता याचा विचार करून डॉक्टर औषध देत असतील तर ह्या मार्केटिंगचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. नितीमत्तेने वागण्याचा एकदा निश्चय झाला तर अशा गोष्टी त्रासदायक वाटत नाहीत. आता राहिला प्रश्न भेटवस्तू वापराच्या की नाही याचा..
गरजूंना शक्य त्या गोष्टी देऊन आपण त्यातूनही मार्ग काढू शकता.

डॉक्टर काय अध्यापनाचा व्यवसायही अशा मार्केटिंगमधून सुटला नाही वा प्रलोभनांचा शिकार झालेला नाही असे नाही.