लेख तर छानच आहे. खूप दिवसांनी वेगळ्या व्यवसायाबद्दलचा लेख वाचायला मिळाला.
मला असे वाटते की एक डॉक्टर म्हणून आपणास जास्त कल्पना असेल की कोणते प्रॉडक्ट चांगले आहे. यात पेशंटचा आजार कसा आहे, परिस्थिती कशी आहे हे पण लक्षात घ्यावे. एक रोगी आपल्यावर विश्वास ठेवून येतो तेव्हा एखादे प्रॉडक्ट महाग असले तरी चांगले आहे म्हणून ते घेण्यास सुचवावे किंवा एखादे चांगले असले आणि एमार दिले नसले तरी चांगले व स्वस्त असेल तर ते सुचवावे.दलाल म्हणण्यापेक्षा आपण 'वकील' म्हणू शकता, तुमच्याकडे येण्याऱ्या रुग्णाचे, कारण ते तुमचे नुसते ग्राहक नसून तुमच्यावर विश्वास ठेवून आपली तक्रार घेऊन आलेले असतात.
अर्थात आम्ही काय नुसता सल्ला देणारे, आपण योग्य ते करत असालच.तरीही वाटले ते सांगितले.
-अनामिका.