ही दलाली सगळ्याच डॉक्टरांच्या मनाविरुद्ध आहे का?

नाही ना! तोच तर खरा प्रश्न आहे. माझ्याही डोक्यात हे आत्ताच यायला लागलंय. यावर काय उपाय करायचा हे अजून ठरायचंय.सध्या तरी मी फक्त माझ्याकडून या गैरप्रकारात पेशंटचे नुकसान होणार नाही इतकेच बघते. 

सामान्य माणूस डॉक्टरने लिहून दिलेली औषधे घेतो. तो मोलेक्यूल कुठला आहे, तो मोलेक्यूल तयार करणाऱ्या दुसऱ्या कोणत्या कंपन्या आहेत, त्या उत्पादनांची किंमत काय आहे, हे सगळे सामान्य माणसाला आपल्या आवाक्याबाहेरचे वाटते- ते तसे नसते हा भाग वेगळा -

हे ही खरेच. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाने असे करावे हा सल्लाही मी कुणाला देऊ शकत नाही. काही वेळा एकच मॉलेक्युल अनेक कंपन्या बनवतात, त्यांच्या किंमतीची रेंज समजा २०० रू. ते ५००रू. असेल तर २०० रू. वालं औषध घेऊ असं पेशंट म्हणू शकत नाही. कित्येकवेळा कंपनी चालू असते किंवा औषध तयार करताना आवश्यक ते नियम पाळलेले नसतात. साधर्म्य सणारे ब्रँडनेम वापरणे तर अगदीच कॉमन आहे. (उदा. पँटोडॅक/ पँटोजॅक.)

एक गंमतीची गोष्ट- माझी नणंद यु. पी. त प्रॅक्टिस करते. तिकडे एमार येऊन जाताच काही दुसरे एजंट येतात.एमारने दिलेली औषधे विकत घ्यायला. ही औषधे "not for sale" असतात तरीही अशी औषधे खास "डॉक्टर्स सँपल" या नावाने औषधे विकणाऱ्या दुकानांत मिळतात. का तर म्हणे डॉक्टरांना देण्यात येणारी नमुन्याची औषधे जास्त प्रभावी असतात असे लोकांना वाटते. :)

                                                                  साती