माधवराव, उत्तम लेख!
कम्युनिकेशन या बाबतीत भारतीय विशेषत: मराठी माणूस कच्चाच असतो. मला वाटते याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अज्ञान. बऱ्याच गोष्टी माहिती नसल्याने चुका होतात. देहबोलीचे प्रदर्शन व वाचन यासाठी देहबोली म्हणजे काय हे माहिती पाहिजे. अगदी साध्या गोष्टी माहिती नसतील तर संवाद हा 'सुसंवाद' होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, हाताची बाकी सर्व बोटे मिटून तर्जनीने एखाद्याकडे बोट दाखवणे हा जगभर अशिष्ट इषारा मानला जातो. सभेत बोलत असताना पँटच्या किंवा जाकिटाच्या खिशात हात घालून बोलणे हा असाच एक इषारा. हे माहीत नसले की अशा गोष्टी नकळत केल्या जातात व मग त्या सुसंवादातला अडथळा -Barriers in communication- ठरतात!
माधवराव, देहबोलीवर एक वेगळा लेख लिहा...