जायचे होते तिला, गेलीच ती
थांबवू शकलो कधी मधुमास मी?

--- आवडले.

नेत नाही ती मला कोणाकडे
जे नको ते बोलतो हमखास मी!

--- याची एक सुप्त छटा याला हझलेतला शेर म्हणूनही महत्त्व प्राप्त करून देऊ शकेल ;)

का अचंबा वाटतो गुण पाहुनी
आजवर केला कुठे अभ्यास मी!

--- अगदी खरं... अभियांत्रिकीचे दिवस आठवले ;) :) :) अर्थात प्रत्येक परीक्षेच्या निकालात ज़ो निकाल लागतो, त्याचे समर्पक वर्णन करणारा हा शेर आहे.

एकूण गझल चांगली आहे. पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.