अगदी बरोबर...
नक्की कोणालाही माहित नाही कोणी काय केले ते... मग मूर्तीची विटंबना करणाऱ्यांचा शोध न लावता, त्यामागील गोष्टींची शाहनिशा न करता बातम्यांवरुन निर्णय घेऊन लगेच सगळीकडे हिंसाचार/जाळपोळ करणे हे कितपत योग्य आहे?


डॉ. बाबासाहेब आंबेडकरां बद्दल आपणास आदर असता तर सगळ्या देशानी बंद पाळायला हवा होता..
आजकाल ह्या देशात कोणी वेळ देतं का? वाहिनीवाले आगीत तेल टाकायला तयार असतातच. लोकही मग न जाणे कुठला राग कुठे काढत असतात. सार्वजनिक मालमत्तेला आणि लोकांच्या जीवाला नुकसान हा मार्ग नाही.

ज्या माणसामुळे आम्ही वर आलो त्या माणसाचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही..
(दंगल / विंटबना?) तुम्ही य गोष्टीला दंगल का म्हणता?? हा दलितांचा आवाज आहे.
अपमान तर सहन होत नाहीच. पण मला नाही वाटत की ज्या माणसाने लोकांकरीता खूप केले त्याने असे सांगितले असेल की आमचे म्हणणे नाही ऐकले तर जाऊन जाळपोळ करा...