आज वृत्तपत्रांत आलेल्या बातम्या राष्ट्रवादी पक्षाकडेच अंगुलीनिर्देश करीत आहेत. हा ढकलाढकलीचादेखिल प्रकार असू शकतो. परंतु अशा घटनांमधून राजकीय लाभ उठवण्याची प्रवृत्ती किळसवाणी आहे. ज्या नेत्यांकडून सामाजिक अशांतता पसरवण्याचे प्रयत्न होतात त्यांना आता जनतेनेच उत्तर दिले पाहिजे (सर्व जनतेने. केवळ दलितांनी नव्हे!).
वृत्तमाध्यमांचा (दृकश्राव्य) बेजबाबदारपणा या घटनेत पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. संयमित वार्तांकनाची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. यापुढे अशा माध्यमांवर सरकारतर्फे खटले भरले गेल्यास नवल नाही.