अभिनंदन महेशराव,
मनोगत स्पर्धेत पारितोषक पटकावणार ह्याबद्दल सुरूवातीपासून शंका नव्हतीच. मधल्या काळात मनोगतावर गैरहजर असल्याने ह्या घटनेचा विसर पडला होता. आज उत्खनन करून ही बातमी शोधून काढलीच !

द्वितीयक्रमांकप्राप्त खेळाडूने प्रथमक्रमांकप्राप्त खेळाडूचे गुणगान करणारा लेख लिहावा ही गोष्ट वातावरणातली निकोपता आणि मराठी भाषेच्या विकासासाठी असलेली आत्यंतिक तळमळ अत्यंत दिमाखात दर्शविते. सचिनरावांचे आणि आपलेही हार्दिक अभिनंदन.

ह्या प्रवासी महोदयांच्या विधानाशी सहमत.
मनोगताबद्दल अल्पनावहिनी 'सवतचि भासे मला' असे काहीसे गुणगुणताना ऐकले हो परवा आम्ही
हा हा हा... घरोघरी मातीच्याच चुली म्हणायच्या की !