१. प.पू. आंबेडकरांबद्दल सर्वांना आदर आहे. मग पुतळ्याची विटंबना करुन त्यांचा अपमान होतो का?. ( एका गाढवाने जर देवाला लाथ मारली तर देवाची विटंबना होते का?)

२. ज्या प्रकारे निषेध व्यक्त झाला तो योग्य होता का? असे निषेध करुन प.पू. आंबेडकरांना आनंद झाला आसेल का?

३. ज्यांना आनंद झाला त्यांनीच नंतर जाळपोळ केला असेल. आणि नंतर त्यांचे अनुकरण करणारे शतमुर्ख. थोडासा विचार करु, याने नुकसान कोणाचे झाले? चुक करणारा राहिला बाजुला, नुकसान सामान्य जनतेला भरावे लागते, ज्यांचा याच्याशी काडिचाही सम्बन्ध नसतो. २१ व्या शतकात आपले आदर्श काय आहेत? त्यांचा पुतळा कि त्यांचे विचार? ( हे विसरुन चालणार नाहि कि त्यांनी मुर्ती पुजेला विरोध केला होता.)

चु. भू̱. घ्या. द्या.