आपल्या व निलकांतांच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद . मराठी विकिपीडिया आता देवनागरी टिचकीक्षम झाला आहे याचा फायदा छोट्या दुरुस्त्या करणे आहे.
- मायक्रोसॉफ्ट संगणक प्रणालीतील अंगभूत टंक - अनेक मायक्रोसॉफ्ट संगणक प्रणाली (जसे विंडोज २०००, विंडोज एक्स.पी., इ) मध्ये युनिकोड टंक अंगतःच असतात. काही छोटे बदल करताच ही सुविधा वापरता येते.
- बराहा डायरेक्टची सुविधा सरळ लेखना करता सुविधा उपलब्ध आहेच.
- मनोगता सारखी स्वयंभू टंकलेखन क्षमता Amharic wikipedia भाषेतील विकिपीडियात उपलब्ध असल्याची माहिती मिळाली आहे. तशी ती मराठीतही विकिपीडियात उपलब्ध करणे अशक्य नाही असे वाटते.
सध्यातरी शुद्धलेखन चिकित्सकाच्या उपलब्धतेमुळे मी विकिपीडियावरील मोठ्या लेखना करता मनोगतच वापरतो फक्त मनोगतावर न प्रकाशित करता ते अप्रकाशित लिखाण शुद्धिचिकित्सेनंतर मराठी विकिपीडियावर हालवतो. त्यामुळे मी मनोगताचा नितांत ऋणी आहे हे निश्चित.
-विकिकर