आभारी आहे,

देहबोलीचे प्रदर्शन व वाचन यासाठी देहबोली म्हणजे काय हे माहिती पाहिजे. अगदी साध्या गोष्टी माहिती नसतील तर संवाद हा 'सुसंवाद' होऊ शकत नाही.

हो हे खरेच आहे.  मागे नोकरीत असताना एक प्रा.गोखलें चे व्याख्यान ऐकताना त्याबद्दल बरीच माहिती मिळाली होती.
आता अंधूकसे आठवते; त्यांनी सांगीतले होते की नोकरीच्या मुलाखतीला जाल तेव्हा अगदी ताठ बसू नये व पोक काढूनही बसू नये.  तसेच बोलताना अधून मधून आपले दोन्ही तळहात एकमेकांत गुंफा ह्याने आत्मविश्वास वाढतो. रक्तदाब कमी होतो व समोरच्याशी बोलताना एक सुनियोजीत दिशा मिळते.
आपण कम्युनिकेशन ह्या विषयांत पारंगत असल्याचे आपल्या एका प्रतिसादात वाचले. आपणही ह्या बद्दल तरूण मनोगतींना अधिक मार्गदर्शन केल्यास आनंद तर वाटेलच व मनोगताचा अजून एका योग्य रितीने वापर होईल असे मनात आले म्हणून ह्या प्रतिसादाचे प्रयोजन !
धन्यवाद.