मराठी विकिपीडियावर सदस्याकरिता काही नवीन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.पहिली म्हणजे आद्याक्षरानुसार लेखांची सोपी अनुक्रमणिका.दुसरी महत्त्वाची सुविधा म्हणजे संपादन करताना कोणतीही विशिष्ट मराठीतील अक्षरे एका टिचकी सरशी सहज निवडता येतात. तिसरे विविध सुविधांनी युक्त म्हणजे मेन्यू बटन्सची संख्या पण वाढवली आहे.त्याशिवाय नावीन्यपूर्ण टेम्प्लेट्स म्हणजे तयार माहितीचौकटी वगैरे पण तयार होत आहेत.

तर काही तांत्रिक सुविधा शक्यतेच्या टप्प्यात दिसतात त्या म्हणजे अल्पावधीत पूर्ण मराठी विकिपीडियाचे शुद्धलेखन दुरुस्त करणारे सांगकामे म्हणजे बॉट्स.तसेच मनोगता प्रमाणेच देवनागरी कळफलक जोडणे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे म्हणजे इतर भाषेतील विकिपीडियात तसे केल्याची उदाहरणे माहीत पडली आहेत.

 
०-९ अं
श्रेणी क्ष त्र ज्ञ श्र अः

-विकिकर