साती,
लेख छान आणि मनापासून लिहिलेला आहे. माझ्या घरी ही दोघेजण डॉक्टर असल्याकारणाने घरभर सगळ्या एम आर ने दिलेल्या भेटवस्तूच मिरवत असतात. जिकडे पाहावे तिकडे औषधांची नावे. अगदी स्वयंपाकघरातही चमचे, बरण्या, कपबश्या, काचेच्या ताटल्या,नॉनस्टिक तवे, मिक्सर, फ्रीजकव्हर, मायक्रोवेव्ह... वीट आल्यासारखे होते. दिवाळीला तर मिठाईच्या बॉक्सची बरसातच होते, आणि तुम्ही म्हणता तसे नाही घेतले तर ते ठेवूनच जातात. एका दिवाळीला तर एका एम आर ने फटाक्यांचा मोठा बॉक्सच दिला होता. :-
एम आर ने काहीही दिले तरी आजारी माणसाला योग्य औषध देणारे तुमच्यासारखे सूज्ञ डॉक्टर असतील तर हरकत नाही पण हा अतिरेकच नाही का ? इतर क्षेत्रात बाजारीकरण वाढलयं, माहित आहे पण किमान वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील बाजारीकरणाची घुसखोरी रोखायला हवी. पण एकूण सगळेच हाताबाहेर आणि आवाक्याबाहेरचे होताना दिसतेय :(
श्रावणी