कालच्या बैठकीला मी, चित्त, अनिरुद्ध, प्रकाश घाटपांडे आणि द्वारकानाथ (सहकुटुंब) उपस्थित होते. सुमित, निरुभाऊ व नीलकांत यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे झाले. पुणे कट्ट्याची माहिती आणि प्रसिद्धी 'सामना' मध्ये करावी यासाठी 'सामना' मध्ये काम करत असलेले मनोगती श्रावण मोडक आणि त्यांचे सहकारी अशोक भट यांच्याशी बोलणे झाले आहे. स्वतःहून याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल मी या दोघांचा ऋणी आहे.
सध्या ठरले आहे ते असे. शनिवार ९ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता कोथरुड येथे जमणे, तेथून पिरंगुट्साठी प्रयाण, रात्री पिरंगुट येथे गप्पा, भोजन व मुक्काम. सहकुटुंब येणारे लोक किंवा ज्यांना ९ तारखेला येणे शक्य नाही अशा लोकांचे १० तारखेला सकाळी आगमन. चहापान इत्यादि. साधारणत: दुपारपर्यंत कट्टा, भोजन व कट्ट्याची सांगता.
शनिवारी रात्री येणाऱ्या लोकांनी कृपया माझ्याशी संपर्क साधून तसे नक्की करावे. त्यानुसार शनिवार रात्रीच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करता येईल.