साती,

प्रामाणिक लेखन भावले.  आपल्याला ज्या काही वस्तू लागणार नसतील तर अनाथाश्रम किंवा तश्या प्रकारच्या संस्थाना खूप उपयोग होऊ शकेल. मी मागे अशा एक-दोन संचालकाशी बोलताना त्यांनी सांगितले होते की त्यांना रोख रकमेप्रमाणेच कोणी भांडी, कपडे (विशेषत: ब्लॅकेंटस), धान्य असे दिले तरी खूप मदत होते. तुम्ही टॉवेल्स, मिक्सर या गोष्टींचा उल्लेख केला ज्या नेहमी लागणाऱ्या आहेत . चॉकोलेट, दिवाळीतले महागडी ड्रायफ्रुटस, अशा संस्थाना (अर्थात चालत असेल तर) वाटता येतील.

सखी