सुभाषराव,
योग्य वेळी मध्यस्थी करून ८५ पर्यंत प्रतिसाद न जाऊ दिल्याबद्दल व एकूण चर्चेला चांगले व शहाणपणाचे वळण दिल्याबद्दल आभार. माझ्यावर तुमची कायम (कृपा)दृष्टी आहे हेही सुखावणारे आहे.
तुम्ही मांडलेल्या मतांशीही मी पूर्ण सहमत आहे. 
अजून पुढच्या भागांचा विचार माझ्या मनात तितका पक्का झालेला नाही. थोडा वैचारिक थकवाही आलेला आहे. पाहू काय सुचते आहे ते. पण तुम्ही दाखवलेल्या दिशा आवडल्या.
तसेही आता पर्रीकरांचे लेखन समजण्याच्या जवळपास वाचकांना आणून सोडले आहे असे वाटते. आणि पर्रीकरांनी जे लिहिले आहे तेच इथे अनुवादित करण्यात फारशी मजा नाही.
दिगम्भा

तात्या, मिलिंद,
भाडण एवढे वाढवलेले रुचलेले नसले तरी त्याशिवाय माझ्या लेखनाला इतके प्रतिसाद कसे मिळाले असते? तुम्ही दोघे आहात म्हणून मनोगताला हा जिवंतपणा आहे. त्याबद्दल आभार, पण पुन्हा नका हो असे करू. प्रतिसादांची संख्या गेली खड्ड्यात.
दिगम्भा