एका नाजुक विषयाला समर्थपणे वाचा फोडल्याबद्दल सातींचे अभिनंदन. प्रतिसादामधून कांही ढोबळ उपाय सुचवले गेले आहेत, पण व्यवहारात त्यात अनेक अडचणी येतात. गरजू माणूस ओळखायचा कसा? तो एखादी गोष्ट तुमच्याकडून घेईलच कशावरून? सार्वजनिक संस्थांना दान करायचे म्हणजे कुणाला? जो माणूस ते घेईल त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? मुख्य म्हणजे या देण्याचा बभ्रा झालेला आपल्याला आवडेल का? फुकटचं मिळतंय म्हणून उदार झाला असे कॉमेंट्स येणारच. एमारकडून मिळण्याऱ्या वस्तू नको असल्या तरी त्यांना भेटणे सुद्धा आवश्यक असतेच. कोणते मॉलेक्यूल्स कोणत्या नावाने बाजारात येत आहेत हे कळण्याचे ते एक साधन आहे. हा विषय गुंतागुंतीचा आहे पण या भेटी आपल्याला आवडत नाहीत हे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे एमारांच्या लक्षात आणून देण्याने फायदा होईल असे वाटते.
औषधाची किंवा कोठल्याही वस्तूची किंमत शेवटी मागणी विरुद्ध पुरवठा या आर्थिक नियमाने ठरते त्यामुळे एमारनी भेटवस्तू देणे बंद करूनसुद्धा त्या खाली येतील असा भरवसा नाही.