माणुस निसर्गाचाच एक भाग आहे असे म्हटले, तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि धर्म हेही निसर्गाचेच भाग आहेत असा निष्कर्ष निघून वरील प्रश्नच निकालात निघतो.
शक्ती प्रदर्शनात कोण श्रेष्ठ असा प्रश्न असेल तर, निसर्ग श्रेष्ठ असे त्याचे निर्विवाद उत्तर आहे.
आपण माणुस आहोत ही गोष्ट ध्यानात घेतली (या गोष्टीला एक स्वतःचा अर्थ आहे हे ध्यानात घेतले) की उत्तर थोडे बदलते.
या निसर्गाला गवसणी घालण्यासाठी माणुस विज्ञानाचे वस्त्र विणतो आहे. विज्ञान आपण त्या निसर्गाचे नियम शोधून काढण्यासाठी, आणि प्रसंगी त्या नियमांचा उपयोग आपल्याला आनंद वाटावा अश्या गोष्टी शोधून काढण्यासाठी वापरतो आहोत. विज्ञान म्हणजे शेवटी निसर्गाला घातलेली गवसणी आहे हे लक्षात घेतले, तर ती तोकडी रहाण्याची शक्याताच अधिक आहे असे वाटते. त्यामुळे निसर्ग कायम विज्ञाना पेक्षा मोठाच राहील असे वाटते.
धर्म हा प्रकार थोडा वेगळा प्रकार आहे. जसजसा माणुस समाज करून राहू लागला, तसतसा, त्याला दैनंदिन व्यवहार सुलभ होण्यासाठी काहीतरी व्यवस्था निर्माण करण्याची गरज भासली. धर्म म्हणजे प्रथमतः ती व्यवस्थाच होय. त्यामुळे माणसाच्या माणुस असण्याला आणि आपण आज जी काही प्रगती केली आहे असे म्हणतो, त्या प्रगतीला धर्म जवाबदार आहे. अशी काही व्यवस्था मुळात निर्माण झाली नसती तर आपण आत्ता कोणत्या तरी झाडावर किंवा गुहेत शिकारीची चिंता करत बसलो असतो किंवा नसतो.
निसर्ग किंवा विज्ञान हे एक असणे आहे, आणि धर्म हे माणुस असणे आहे. निसर्ग श्रेष्ठ आहेच, पण धर्म आणि विज्ञान ही आपल्या एकुणच असण्यासाठी (म्हणजे मानवासाठी) अत्यंत आवश्यक आहे.
ते नसेल तर नद्या वाहूदेत, सूर्य उगवू दे पाऊस पडू दे, पृथ्वी असू दे किंवा नसू दे, कोणाला काय कळणार आहे?
-मन्दार