आपल्याला अशी लाज वाटणे साहजिक आहे. कदाचित वेळ मिळाल्यास मी माझे अनुभव कथन करेन. पण अनेक भारतीयांना आपण भारतीय असल्याची वा भारताची लाज वाटते याची मला फार लाज वाटते.

आपल्याला भारताबद्दल एवढी लाज वाटताना मला काही प्रश्न पडले.

  1. या अभारतीयांची भारता बद्दल काय अपेक्षा आहेत?
  2. भारता मध्ये या काही समस्या आहेत हे मान्य. पण त्यांना हे जे अनुभव आले ती परिस्थिती समजून घ्यायला नक्की आवडेल. मग भाष्य करणे योग्य.
  3. आपल्याला जगातील अश्या अभारतीय लोकांची बौद्धिक गुलामगिरी करताना लाज वाटते का?
  4. पुरुषांच्या वाईट नजरा फक्त भारतात होतात का?
  5. प्रत्येक देशाला स्वतःचा एक समाज असतो, त्याच्या सवयी, सिद्धांत अन परिस्थिती असते. त्यावेळी राज्य करताना, बिटिशांना, फ्रेंच, डच लोकांना याचे भान नव्हते का? भारताला भिकेला लावताना कुठे गेली होती सभ्यता अन संकेत?
  6. माझे अनुभव वेगळे आहेत. आज पर्यंत ज्या अभारतीय लोकांशी माझा संबंध आला ते भारतावर प्रेम करतात अन परत परत भारतात येण्यासाठी कारणे शोधत असतात.
  7. अशाच एका चर्चेत एका ब्रिटिश स्त्रीने भारताच्या आजच्या परिस्थितीला ब्रिटिश जबाबदार आहेत हे मान्य करून माफी मागितली होती.
  8. आपल्यातले किती जण फक्त काम करण्याचे समाधान या कारणासाठी भारता बाहेर जाता? आपण चांगले राहणीमान अन तिथे वाचणारा पैसा भारतात अनेक पट होतो म्हणून जात नाही का?
  9. जगात सर्वात वाईट पुरूष अन सर्वात वाईट समाज हा फक्त भारतीय समाज आहे का? की अभारतीयांना असे अनुभव फक्त भारतातच येतात?
  10. मुख्य, आपल्याला एवढी लाज का वाटली? या प्रसंगांमुळे की या प्रसंगामुळे या लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दरिद्र, गलिच्छ भारतातले लोक असा झाला म्हणून?