आठवड्याच्या रामरगाड्यात गुंतण्यापूर्वी थोडा वेळ आहे... तेवढ्यात हा धावता प्रतिसाद...

आपल्याला अशी लाज वाटणे साहजिक आहे.
हे वाचून बरे वाटले. दुर्दैवाने आहे हे असे आहे, त्यात लाज वाटण्यासारखे काय किंवा इतरदेशीयांकडे काय नंगानाच कमी असतो काय असे प्रश्न विचारण्याची मानसिकता काही ठिकाणी दिसून येते.

कदाचित वेळ मिळाल्यास मी माझे अनुभव कथन करेन.
हेच मीही म्हणतो. आपले आणि इतरांचेही वाचायला आवडेल.

पण अनेक भारतीयांना आपण भारतीय असल्याची वा भारताची लाज वाटते याची मला फार लाज वाटते.
कोणत्या कारणासाठी लाज वाटते यावर बरेचसे अवलंबून आहे. भारत नको अशा मानसिकतेतील भारतीयांची मलाही लाज वाटते. मात्र भारतातील लाजिरवाण्या घटनांमुळे लाज वाटणाऱ्या देशवासीयांमुळे अभिमानच वाटतो.

आपल्याला भारताबद्दल एवढी लाज वाटताना मला काही प्रश्न पडले.
निवडक उत्तरे -

  1. माझे अनुभव वेगळे आहेत. आज पर्यंत ज्या अभारतीय लोकांशी माझा संबंध आला ते भारतावर प्रेम करतात अन परत परत भारतात येण्यासाठी कारणे शोधत असतात.
    अशीही बरीच मंडळी नक्कीच आहेत.
  2. जगात सर्वात वाईट पुरूष अन सर्वात वाईट समाज हा फक्त भारतीय समाज आहे का? की अभारतीयांना असे अनुभव फक्त भारतातच येतात?
    असे नाही. पण इतरत्र आणखी लाजिरवाणे किंवा किळसवाणे प्रसंग घडतात याचा आणि माझ्या देशात काही नको ते घडते याची सांगड घालता येत नाही.
  3. मुख्य, आपल्याला एवढी लाज का वाटली? या प्रसंगांमुळे की या प्रसंगामुळे या लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दरिद्र, गलिच्छ भारतातले लोक असा झाला म्हणून?
    मला विचाराल तर लाज केवळ या प्रसंगामुळे वाटली. माझ्या देशातील माणसे अशी वागावीत यामुळे वाटली. अशा प्रसंगामुळे आजूबाजूच्या लोकांचा माझ्याविषयीचा दृष्टिकोन बदलेल याची सुतराम शक्यता नाही.
    मृदुलाच्या लेखातील व्यक्तींविषयी नेमके माहीत नाही. पण त्यांचेही थोडेबहुत असेच असावे असा अंदाज.