मृदुला, भीक हे श्रीमतींचे लक्षण आहे असे मला वाटत नाही. आपण आपल्या मुख्य मुद्द्यात टीप व भीक हे दोन्ही वापरले आहे. जर टीप देण्याला लोक भीक समजत असतील तर मग आपले काय म्हणणे आहे?
आपल्या लुईने सर्व चीन अन थायलंड पिंजून काढला आहे का?
जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्ट्या भारतात आहेत हे तर जगजाहीर आहे. त्या का आहेत हे तुम्हा आम्हा भारतीयांना चांगलेच माहीत आहे आणि त्याला आपण सर्वजण अप्रत्यक्षरीत्या जबाबदार आहोत याची आपल्याला लाज वाटत नाही हे ही तितकेच खरे आहे.
माझे वैयक्तिक मत असे आहे की जागतिकीकरणाच्या रेट्यात प्रत्येक जण या ना त्या प्रकारे ढवळून निघत आहे. यात भारतीय लोकांचा खास करून मध्यम आणि उच्चमध्यमवर्गियांचा स्वतःपुरता फायदा होत आहे. खास करून संगणकीय क्षेत्रात. अन त्या वर्गाला इतर समाजाशी काही देणे घेणे आतातरी आहे असे वाटत नाही. इतके वर्ष पिळून निघाल्याने तो सुद्धा आपली पोळी भाजून घेत आहे. खरं सांगायचं तर भारतात देशाभिमान हा नावा पुरता आहे. अन शिवाजी शेजारच्या घरात जन्मावा हि प्रत्येकाची इच्छा. त्यामुळे असे प्रसंग घडणे नवल नाही.
भारतात समाज हा मृत समाज आहे. समाजाच्या जाणीवा निद्रिस्त ज्वालामुखी प्रमाणे आहेत. कदाचित आता त्या मृत ज्वालामुखीच्या आहेत अशी जाणीव होवू लागली आहे.
समाज आपण बनवतो, त्यामुळे लाज आपली आपल्याला वाटली पाहिजे. कोणता समाज तुम्हाला पटकन सामावून घेतो? अमेरिकेत यासाठी विधयके करण्याचे घाट घातले जातात.
भारताला अभिमानास्पद अन आपल्याला अभिमान वाटला पाहिजे असा समाज घडवणे आपले कर्तव्य आहे. पण आपण लोक भारत सोडून जातो. या सगळ्या सगळ्यातून आपली पळवाट शोधतो. अन कधी तरी मग अशीच आपल्याला आपली लाज वाटते.
आपल्या सहकाऱ्यांना आलेले अनुभव नक्कीच लाजिरवाणे आहेत. पण जागतिक पातळीवर नेहमीच भारताचे चित्र असे रंगवले जाते. याचा खेद वाटतो. भारतात अनेक गोष्टी अश्या घडतात ज्या या अभारतीयांना माहीत सुद्धा नसतात. पण भांडवल होते ते याचे.
भारताला गरज आहे ती तरुण रक्ताने देशाची सूत्रे हातात घेऊन जगा समोर आदर्श ठेवायची. पण ज्या तरुणांमध्ये हे करून दाखवण्याची क्षमता आहे ते भारत सोडतात अन मग उरलेल्यांना रान मोकळं. मला याची लाज वाटते.