भारतीयांच्या प्राथमिक गरजा भागल्याशिवाय सर्वसामान्य माणसाकडून सामाजिक परिस्थितीत योग्य वर्तनाची अपेक्षा करणे बरोबर नाही. अमेरिका, इंग्लन्ड, फ्रांन्स मध्येही ज्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण भागलेल्या नाहीत त्यांचे वर्तन ह्या पेक्षा निराळे नाही. इतकेच की तेथे अश्यांची संख्या फार मर्यादित आहे, त्यामुळे अश्या लोकांवर नियंत्रण ठेवणे, किंवा त्यांना पडद्याआड ठेवणे शक्य आहे.
राहीला प्रश्न भारत भेटीला येणाऱ्या लोकांच्या सध्याच्या अनुभवांचा. त्या सर्वांकडून भारताच्या अश्या समस्यांचा सर्वांगीण विचार करण्याची कुवत व इच्छा असण्याची अपेक्षा ठेवणे योग्य नाही. प्रत्येकाला कडू-गोड अनुभव येणारच आणि त्यामुळे काही बाबतीत आपली मान खाली जाणारच.
ज्या समाजात गेले कित्येक वर्षे पुण्याची दुर्दशा करणारे (रस्त्यांवरील खड्डयासकट) कलमाडी आणि इतर अनेक पुढारी आरामात सुख भोगत आहेत, किंवा बंगलोरमध्ये इतका पैसा येऊनही त्या शहराची वाताहात करणारे राज्यकर्ते राज्य करू शकतात, त्या समाजाकडून तुम्ही योग्य वागणूक कशी अपेक्षीत करता?
आपण करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपली वर्तणूक समाजाला सहाय्यकारक ठेवणे आणि पुढच्या निवडणूकीत मतदान करणे आणि ह्या राज्यकर्त्याना त्यांची जागा दाखवून देणे. योग्य राज्यकर्ते खुर्चीवर आले की ह्या आणि अश्या अनेक समस्या रहाणारही नाहीत.
पाश्चिमात्य देशात रहाणारे आपल्यापैकी किती लोक भारतात आल्यावर कचरा कचऱ्याची पेटी शोधूनच टाकतात? मग इतरांकडूनच ही अपेक्षा का?
शेकडो वर्षे पारतंत्र्य, त्यानंतर स्वातंत्र्याची एक पहाट आणि त्यानंतर कित्येक वर्षे फक्त स्वैराचार ह्याची ही फळे!
- (मान खाली घालून) अभिजात