फारच सुंदर लेख आहे. संवाद साधणे हि एक कला आहे या बद्दल सहमत. पण कला काहींना जन्मजात असते, काहींना शिकून मिळवता येते अन काहींना नाही जमत.
मला आपले सगळे मुद्दे पटले. स्वानुभवाने बरेच शिकलो. एका मुलाखती मध्ये आधीच्या नोकरी मधल्या राजकारणावर इतके बोललो की त्यामुळे संधी घालवली. नोकरीच्या मुलाखती मध्ये खास करून नेमके बोला हे सूत्र जास्त उपयोगी पडले. बाकी देशोदेशीच्या अनेक लोकांसोबत बोलून सुद्धा बरेचदा संवादाची कला आणखी चांगली शिकता आली.