दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे. त्याची लाज वाटावी किंवा नाही यावर दुमत असू शकेल. पण इतरत्र वाईट गोष्टी घडतात म्हणून याचे समर्थन होऊ शकत नाही. स्त्रियांना भारतात छेडछाडीला बऱ्याच प्रमाणात तोंड द्यावे लागते आणि परदेशी स्त्रियांना जास्त.  मधल्या काळात राजधानीमध्ये परदेशी स्त्रियांवर बलात्काराचे प्रमाणही वाढले होते. बरेच लोक जाण्याआधी काय करावे आणि काय करू नये ह्याची माहीती करून घेतात.

आपल्याकडे जास्त पैसे घेण्याचे जे प्रकार चालतात त्याला टीप न म्हणता लूट म्हणणे जास्त योग्य होईल. मी पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करत असताना माझ्याबरोबर एक जर्मन मुलगी, सँड्रा, काम करीत असे. एकदा काम संपवून आम्ही मनपाला जाण्यासाठी 'सिक्स सीटर' घेतली. मनपाला उतरल्यावर चालकाने माझ्याकडून नेहमीप्रमाणे पाच रुपये घेतले पण सँड्राला तो पन्नास रुपये मागू लागला. मी असे का विचारल्यावर मला म्हणाला, "तुम्हाला काय करायचे आहे? तुमच्याकडून नाही घेत ना?" पाच मिनिटांच्या वादावादीनंतर शेवटी त्याने तिच्याकडूनही पाच रुपये घेतले. नंतर मी तिला विचारले, "तू एकटी असताना काय करतेस?" ती म्हणाली, "ते जे मागतील ते मी देते."  मुंबई विमानतळावर उतरल्यावर बसपर्यंत सामानाला हात लावल्याबद्दल एकदा एकाने माझ्याकडे डॉलरमध्ये मागणी केली होती.

माझ्या मते आपली संस्कृती पर्यटकांसाठी सज्ज नाही. आणि शासनाला यातील महसूल दिसत नाही ही अजून दुर्दैवाची गोष्ट आहे. इटलीसारखा देश पर्यटनावर जे कमावू शकतो तसे आपल्यालाही करता येईल. जे आपल्या शेजारच्या सिंगापूरला जमते ते आपल्याला का नाही ह्या प्रश्नाचे उत्तर अजून मला सापडलेले नाही.

हॅम्लेट