आपल्या काही मुद्द्यांना कदाचित परत राजकारणी लोक हेच कारण आहे. आपल्याच देशात पाहिले तर केरळ आणि गोवा हि दोन राज्ये पर्यटनावरच महसूल गोळा करतात. त्यामुळे आपल्याला जमत नाही हा मुद्दा अमान्य. जमणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणा हवं तर.
पर्यटनासाठी चांगले वातावरण तयार करणे हे स्थानिक लोकांचे काम जास्त आहे. त्याची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. कोंकणात हे घडत आहे. परदेशी पर्यटकांबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा, केरळ, गोवा अन राजस्थान या राज्यांना जास्त पसंती देतात. बिहार मध्ये कोणी पर्यटक आवडीने गेल्याचे माझ्या ऐकण्यात तरी नाही.
वर शशांकने जे मुद्दे लिहिले आहेत ते आणि भारताच्या गरिबी बद्दलचा प्रचार यामुळे सुद्धा आपल्याकडे पर्यटन म्हणावे तितके नाही.
जगाच्या इतर कोपऱ्यात, प्रत्येक गावाचा इतिहास अन प्रत्येक गावाचे असे काही खास जपून ठेवले आहे. पाहायला गेले तर हे सगळे सामान्यच असते. पण आपले ते चांगले हे ठसवण्याचा मुद्दा या लोकांमध्ये फार चांगला असतो.
पुण्याबद्दल म्हणाल तर तो विषय फारच वेगळा आहे. पुण्यात बाहेर गावाहून आलेल्या माणसाला सुद्धा रिक्षावाले लुबाडतात. मग परदेशांचे काय होणार?