विक्शनरी प्रकल्प पाहिला. कोणत्याही शब्दाची माहिती देताना त्या शब्दाचा प्रकार ह्या अर्थी व्याकरण असा शब्द वापरला आहे तो खटकला. उदाहरणार्थ

वाहतुक

व्याकरण - नाम
लिंग - स्त्रीलिंग
वचन - लागू नाही

असे दिसते. लिंग, वचन हेही व्याकरणच आहे. त्यामुळे शब्दप्रकार - नाम असे पाहिजे असे वाटते.