पण अनेक भारतीयांना आपण भारतीय असल्याची वा भारताची लाज वाटते याची मला फार लाज वाटते.

आपले वरील वाक्य मला अगदी पटले आणि तसेच मुद्देही. त्यात माझी भर (अर्थात याचा अर्था मला भारतात सर्व काही आलबेल आहे, असा अजिबात नाही, पण आपण नागरी कर्तव्य करतोय का आणि सामजीक भान ठेवतोय का हा कळीचा मुद्दा वाटतो):

  1. चर्चेतील ज्य ब्रिटीश अथवा फ़्रेंच माणसाने नावे ठेवली आहेत ती जास्त करून भारतातील दारीद्र्याशी संबंधीत आहेत. त्यामुळे सर्व सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय अथवा नवश्रीमंताना भारताची लाज वाटते, पण आता खालील उदाहरण वाचा:
  2. ज्या गोष्टी आपण पाश्चिमात्यांकडे आवडतात म्हणतो, अमेरिका, युरोप वगैरे मधे म्हणून भारतीय राहातात, त्यातील किती गोष्टी/सुविधा ('सिव्हील सिस्टीम्स") या आपण तिथे तयार केल्यात म्हणून भारतात जाऊन किंवा महाजालावर त्यावरून भारतीयांपुढे "शाईन" (!) मारायची? आपण फक्त दुसऱ्याने केलेल्या गोष्टींचा उपभोग घेतो - मग ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असो की लंडन अथवा न्यू यॉर्क असो...तेंव्हा आपण स्वतः काय करतोय हा प्रश्न विचारा आणि स्वतःची लाज वाटते का ते पहा.
  3. गरीब लोकांसाठी मदतीचा हात ह्या देशातील लोक पुढे करतात तसा आपण (केलाच तर) भूकंप आणि महापूर सोडल्यास करतो का? ख्रिसमसच्या वेळेस गरीब मुलांसाठी बऱ्याच कचेऱ्यात नवीन खेळणी गोळा केली जातात. सामान्य कर्मचारीही महागडी खेळणी आणून देतात. आपण दिवाळीच्या वेळेस असे करतो का? एक तर फटाके उडवून, लाडू खाऊन दिवाळी साजरी करणार किंवा आता रूढी बदलल्या पाहीजेत म्हणून घरात काही न करता प्रवासाला जाणार...समाज अशा पद्धतीने  कींवा  नुसती लाज वाटून आणि आयत्या पिठावर रांगोळी काढण्याच्या वृत्तीने मोठा होत नसतो.
  4. थायलंड चे उदाहरण देताना आणि तशाच प्रकारे गोव्याच्या बाबतीत ही, हेच युरोपिअन्स (ब्रिटीश अर्थातच आले)तिथे जाऊन जे लैंगिक चाळे लहानमुले आणि वयात येऊ घातलेल्या मुलींबरोबर करतात (अर्थातच स्थानीक लोकांच्या मदतीने) तेंव्हा त्यांच्या देशातील त्यांच्या जातभाईंना लाज वाटत नाही की आपल्याकडील उच्चवर्गीय/नवश्रीमंतांना राग येत नाही की काळजी वाटत नाही.
  5. भारतात एड्स येयचे कारण अथवा थायलंडमधे एड्स वाढायचे कारण हे कोण आहे? - तेंव्हा लाजेचे काय होते?
  6. चिनच्या बाबतीत - जिथे लोकशाहीच नाही तिथे काहीही होऊ शकते. तसे काय बिल क्लिंटनसाठी आणि गेट्ससाठी, चंद्राबाबूनी हैद्राबाद मधील सर्व भिकाऱ्यांना तुरूंगात ठेवले होतेच की..
  7. अमेरिकेत तर बघा, ना ओव्हल ऑफ़िस"वापरणाऱ्या" बिल क्लिंटनची लाज वाटते, ना स्वतःच्या "बालहट्टा" पोटी अगणीत निरपराध्यांचे (अमेरिकन आणि इतर) बळी घेणाऱ्या बुशबद्दल लाज वाटते.

सरते शेवटी: मला काही वर्षांपुर्वी एका गोऱ्या अमेरिकन माणसाशी कामानिमत्ताने दररोज संबंध येयचा. त्याला राजकारण आणि समाजकारणाबद्दल गप्पा मारायला आवडायच्या. एकदा तो असेच बोलताना म्हणाला की, तुम्ही लोक (भारतीय आणि पुर्वेकडील संस्कृती), संस्कृती म्हणून आम्हाला (अमेरिकन्सना) फ़ार बालीश समजत असाल. मी विचारले, तसे का बरं? तर तो म्हणाला चारशे-पाचशे वर्षाचाकाळ हा एखाद्या राष्ट्राच्या दृष्टिने फारच लहान आहे. त्यातील यश बघून आम्ही स्वतःला "कालातीत" यशस्वी समजतो, पण "काळ" काही एव्हढा लहान नाही आणि स्थितीस्थापक ही नाही...

थोडक्यात कालानूरूप आपण बदलायला तर हवेच, त्यात वाद नाही, पण ते फक्त काही दारीद्र्य भेडसावणाऱ्यांसाठी नाही तर त्याहूनही अधिक आर्थिकदृष्ट्या वरील स्थरातील लोकांसाठी जास्त लागू आहे.