हो पण शासन आपणच तयार करतो ना?
अफजल खानाच्या कबरीची काळजी सरकार घेते काय? ती जागा इतर किल्ल्यांपेक्षा जास्त चांगली जतन केली आहे. असे ऐकून आहे.
तसे बोलायला अतिथी देवो भव!! हि आमची शिकवण. पण आजच्या गोंधळलेल्या समाजात नक्की काय आत्मसात करावे हे आमच्या समाजाला कळत नाही. त्याला पाश्चिमात्यांचे अंधानुकरण पटते. पण त्यांचा पाहुणचार चांगला करावा हे नाही कळत. आता याला शासन काय करणार?
वाइन उद्योगाला चालना द्या असे वारंवार ज्यांना सांगता येते त्यांना समाजावर प्रभाव पाडणे इतके कठिण आहे का? ईंटेलचे अध्यक्ष बारामतीला जाऊन एक छोटीला लॅपटॉप देतात. मग बाकीच्या गावात काय या प्रतिभेची मुले नाहीत का? सांगायचा मुद्दा की करायचे ठरवले तर आम्ही करू शकतो. पण वैयक्तिक पातळीवरची मानसिकता हा एक कळीचा मुद्दा आहे तो व्यक्ती इतकाच सोपा अन अवघड सुद्धा आहे.